भिकेकोनाळ तरुण युवक मंडळाचा अभिनव उपक्रम
दोडामार्ग : प्रतिनिधी
जागतिक महिला दिनाचं औचित्य साधत भिकेकोनाळ तरुण युवक मंडळाचे कार्यकर्ते माऊली मतिमंद निवासी विद्यालय, आरोस कोंडुरा (ता.सावंतवाडी) येथे सदिच्छा भेट दिली. यावेळी निवृत्त कॅप्टन श्री.सहदेव धुरी, श्री.लवु सावंत, श्री.मधुकर परब, प्रकाश नाईक, यशवंत गवस आदी मान्यवर उपस्थित होते.
भिकेकोनाळ तरुण युवक मंडळाच्यावतीने ५० किलो तांदुळ, १० किलो तुरदाळ व ग्लुकोजयुक्त बिस्कीटे, वह्या व पेन आदी दैनंदिन व्यवहारातील आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. भिकेकोनाळ तरुण युवक मंडळ विविध दिनांचे औचित्य साधत अनेक सामाजिक उपक्रम राबवत आहेत. काही दिवसांपूर्वी वार्षिक जत्रोत्सवाचे निमित्त साधून रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले होते. त्यावेळी 21 रक्तदात्यांनी रक्तदानाचे कार्य केले. मंडळाचे अध्यक्ष विठ्ठल गवस कार्यकर्ते दत्ताराम नाईक, गोविंद दळवी, शुभम धुरी, तन्मय बोर्डेकर, सर्वेश सावंत कार्यकर्ते सक्रिय सहभाग घेत आहेत.

No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.