Pages

Pages

Monday, March 9, 2020

मंडल निरीक्षकांच्या गाडीची अज्ञाताकडून तोडफोड ; काळसे बागवाडी येथील घटना

बागवाडी येथे चोरट्या वाळू वाहतूकीची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मंडल निरीक्षकांच्या गाडीची अज्ञातानी तोडफोड केल्याची लेखी तक्रार
मालवण :- काळसे बागवाडी येथे चोरट्या वाळूची वाहतूक होते आहे काय? याची पाहणी करण्यासाठी गेलेल्या मंडळ निरीक्षकांच्या खाजगी गाडीची अज्ञात इसमानी तोडफोड केल्याची लेखी तक्रार मालवण पोलीस स्थानकात आंबेरीचे मंडळ निरीक्षक अनिल पवार यांच्यासह पोईपचे मंडल निरीक्षक राजेंद्र शिंगाडे, पेंडुरचे मंडल निरीक्षक उमेश राठोड यांनी दिली आहे. या लेखी तक्रारीत आपल्याला मारहाण झालेली नाही, असे नमूद करून गाडी फोडल्या प्रकरणी अज्ञातावर गुन्हा दाखल करण्यात यावा असे म्हटले आहे. दरम्यान, गेले दोन दिवस काळसे बागवाडीत बेकायदा चालणाऱ्या वाळू उत्खननाची चौकशी करण्यास गेलेल्या महसुलच्या विभागाच्या काहींना अज्ञातांनी मारहाण केल्याची चर्चाही सुरू होती.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार येथील कर्ली खाडीत चोरट्या पद्धतीने वाळू उत्खनन होते, अशी चर्चा होती. त्या चर्चेनुसार शुक्रवारी काळसे बागवाडीमध्ये आंबेरीचे मंडळ निरीक्षक अनिल पवार हे आपले सहकारी पोईपचे मंडल निरीक्षक राजेंद्र शिंगाडे, पेंदूरचे मंडला निरीक्षक उमेश राठोड यांच्या समवेत आपल्या ताब्यातील खासगी गाडी घेऊन गेले होते. ही गाडी काळसे बागवाडी येथे एके ठिकाणी उभी करून बेकायदा वाळू उत्खनन होते का याची पाहणी करण्यास हे तिघेही गेले. मात्र त्यांना त्याठिकाणी काही आढळून आले नाही. ते माघारी परतले असता आपल्या गाडीची अज्ञाताने तोडफोड केल्याचे आढळून आले. याबाबत त्यांनी मालवण पोलीस स्थानकात लेखी तक्रार अर्ज दिला असून अज्ञाताविरोधात कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. मालवण पोलिसांनी याबाबत मंडल अधिकाऱ्यांचा तक्रार अर्ज आल्याचे सांगितले. पोलीस या तक्रार अर्जावर चौकशी करत आहेत.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.