Pages

▼

Pages

▼

Saturday, June 20, 2020

कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथे कंटेन्मेंट झोन


सिंधुदुर्गनगरी : कुडाळ तालुक्यातील पिंगुळी येथील गोंधळपूर, मुस्लिमवाडी हे केंद्रबिंदु मानुन, पिंगुळी-गोंधळपूर, मुस्लिमवाडीच्या ५०० मीटरचा परिसर कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आला आहे. सदर कंटेन्मेंट झोनमध्ये दिनांक ३ जुलै रोजीपर्यंत सर्व आस्थापना, दुकाने, अत्यावश्यक सेवा, वस्तूविक्री बंद राहणार आहे. तसेच या क्षेत्रामध्ये नागरिकांना येणे – जाणे व सर्व प्रकारच्या वहनांना प्रवेश बंद असेल. हे आदेश अत्यावश्यक सेवा, सार्वजनिक वितरण व्यवस्था, वैद्यकिय उपचार व्यवस्था, बँक, सेवा देणारे अधिकारी, कर्मचारी व त्यांची वाहने यांना लागू राहणार नाही असे आदेश कुडाळच्या उपविभागीय अधिकारी वंदना खरमाळे यांनी दिले आहेत.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.