Pages

Pages

Saturday, March 14, 2020

समाजप्रबोधनकार ' ते ‘विधानसभेचे उपसभापती’!!

समाजप्रबोधनकार ' ते ‘विधानसभेचे उपसभापती’!!

 ‘बंधू- भगिनींनो विचार करा….. दोन पानांचा संसार करा…. मोठ्या या संसाराची होतीय माती…. लगीन करायची आता वाटतेय भिती.’  ह्या गाण्याचे निर्माते बनले चक्क विधानसभेचे उपसभापती....
https://www.facebook.com/100046882350835/posts/126937215545690/

टिम KONKAN मिरर-

दिंडोरी या नाशिक जिल्ह्यातल्या एका अगदीच लहानशा आदिवासी पाड्यात, कलापथक गाजवणाऱ्या कुटुंबातील नरहरी झिरवाळ हे आमदार बनले.आणि नुकताच भाजपच्या उमेदवाराचा अर्ज मागे घेतल्यामुळे झिरवाळ हे बिनविरोध विधानसभेच्या उपसभापतीपदी विराजमान झाले आहेत. कधीकाळी अगदी गावोगावी समाज प्रबोधनाचे कार्यक्रम करीत त्यांचा उदरनिर्वाह होत होता.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे दिंडोरीचे आमदार असलेल्या झिरवाळ यांनी काल ज्येष्ठ नेते व महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ व सहकारी आमदारांसह विधानसभा उपाध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला. एक दर्दी कलाकार, समाजप्रबोधन करणारे कलापथक चालविणारा कलाकार आता विधानसभेच्या आमदारांचे कसे प्रबोधन करतात हे आपल्याला पाहायला मिळणार आहे.

झिरवाळ हे अनेकदा ते सार्वजनिक कार्यक्रमात देखील आपली कला सादर करुन युवकांचे व आयोजकांचे मन जिंकतात. बाल विवाह, कुटुंब नियोजन यावर जनजागृतीपर ‘बंधू- भगिनींनो विचार करा….. दोन पानांचा संसार करा…. मोठ्या या संसाराची होतीय माती…. लगीन करायची आता वाटतेय भिती.’ ही त्यांची गाणी खूपच गाजली आहेत. या गाण्यांचे सादरीकरण करून ते लोकांचे लक्ष वेधून घेत.

विविध कोट्या करीत मुलांनी कलात्मकता अंगीकारावी असे आवाहन करीत ‘मला वसतीगृहात प्रवेश मिळाला तो कोणाच्या शिफारशीने नव्हे तर माझ्या कलेमुळे. आता माझ पोट वाढलय, नाही तर मी नाचलोही असतो.’ असे सांगत त्यांनी सगळ्यांचीच मने जिंकली. आता ते विधानसभेत कसे काम करतात व लोकांचे मने जिंकून घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.