Pages

Pages

Saturday, March 14, 2020

कुणकेरी हूडोत्सवास बाहेरील नागरिकांना " नो एंट्री "....

कुणकेरी हूडोत्सवास बाहेरील नागरिकांना " नो एंट्री "....

'कोरोनाने' पाडलं ग्रामस्थांसह पर्यटकांच्या 'आनंदावर विरजण'...


सावंतवाडी:- असीम वागळे
सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी येथील प्रसिद्ध हुडोत्सवास यावर्षी कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर गावाबाहेरील भाविकांवर येण्यास प्रशासनाने बंदी घातली आहे . शिमगोत्सवात होणाऱ्या या उत्सवाला गोवा, कर्नाटक तसेच संपूर्ण महाराष्ट्रातून लोक आवर्जून उपस्थित असतात पण यावर्षी कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव असल्यामुळे प्रशासनाने या उत्सवाला गावाबाहेरील नागरिकांनी उपस्थित राहू नये असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे दरवर्षी मोठ्या थाटामाटात होणारा हा उत्सव साध्या पद्धतीत साजरा केला जाणार आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.