Pages

Pages

Saturday, February 1, 2020

कोकण Mirror तुमच्या भेटीसाठी

नमस्कार नेटीजन्स हो. . .
कोकण Mirror आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे. आपण नेटीजन्स हेच अशा नवख्या आणि सामाजिक प्रबोधन करू पाहणाऱ्या कोकण Mirror चे सर्वतः आधारस्तंभ आहात. काळ झपाट्याने बदलत आहे. काळाच्या गतीबरोबर धावण्यासाठी मानवी समाज हतबल आहे. आणि तेवढाच तो अधुरा आहे. पण तंत्रज्ञानाच्या आधारे आपण काळाचा पाठलाग करतो आहोत. अगदी प्रकाशाच्या वेगाने. इंटरनेटमय झालेल्या या जगात इंटरनेट न्युज एडिशन असणे, ही काळाची गरज आहे. जगभरच्या मिडियामध्ये, मग तो प्रिंट असो इलेक्ट्रोनिक असो किंवा मग ऑनलाईन अर्थात नेट एडिशन असो, आजचा खरा नटसम्राट म्हणजेच नेटसम्राट. आम्हाला खात्री आहे, आमचे अविरत प्रयत्न आणि तुम्हा नेटीजंसचे प्रेम कोकण Mirror ला नक्कीच नेटसम्राट बनवेल.
आम्ही नेट पत्रकारितेच्या जगात पाय ठेवत आहोत. काळ कुठलाही असो आणि कसाही असो पत्रकारिता ही समाजाची, समाजासाठी समाजाभिमुख असावी लागते. याचे आम्हाला तीव्र भान आहे. पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा खांब आहे. तसेच या क्षेत्रामध्ये, आपल्या देशामध्ये हिमालयाच्या उंचीची थोर माणसे होऊन गेली आहेत. या वास्तवाचे भान आणि त्याचा अभिमान कोकण Mirror ला कायम राहील.
नेट एडिशन म्हणजे फास्टफूड. जे काही फास्ट असेल, चमचमीत असेल त्या पॅकेज बरोबर लोकल पासून ग्लोबल पर्यंत सर्व छोट्या मोठ्या महत्वाच्या घडामोडी, आम्ही डिस्प्ले करू. होमपेज पासून इन्फोटेक ते यंगीस्थान तुम्ही सहज क्लिक करू शकता, एका क्लिकवर. आपल्या देशात घडणाऱ्या घटनांपासून थेट युरोप, अमेरिकेत घडणाऱ्या घटना, न्युज रूपाने तुमच्या समोर येत राहतील. सर्वांग सुंदर अशा सह्याद्रीच्या कुशीत वसलेली जिल्ह्यातील गावं, त्यांची ख्याली खुशाली, पश्चिम घाटाच्या संदर्भातले सर्व भौगोलिक सामाजिक व राजकीय कंगोरे कोकण Mirror तुमच्या समोर आणेल. ग्रामीण भागातील समस्या, तरुण नव तरुणांचे प्रश्न, बदलती शहर, त्याचे रंगरूप या साऱ्याचा लेखाजोखा update होत राहील. बदलत्या जनजीवनाचे चित्रण तसेच सिटीझन जर्नालिझममधून सर्व जनांची मते आणि नव्या कॉलेजियन्सची ओपिनियन आपल्या या आवडत्या न्युज पोर्टलवर वाचता येतील. आणि इतकच नव्हे तर तुम्हाला स्वतः यामध्ये सहभागी होता येईल. हे तुमचे हक्काचे पोर्टल आहे.
कोकणच्या या तांबड्या मातीत ऑनलाईन जर्नालिझमची परंपरा आताशा कुठे सुरु होत आहे. यामध्ये कोकण Mirror ला महत्वाचे स्थान मिळवायचे आहे. ऑनलाईन जर्नालिझम आता सर्वत्र कॉमन होत आहे, पुढेही होणार आहे. या माध्यमाची ताकद तंत्रज्ञानावर आधारलेली असली, तरीही ज्या शेवटच्या झोपडीत तंत्रज्ञानाचा चिमूटभरही प्रकाश पोचला नाही, अशा दुर्बल घटकांना बळ देण्याची ताकद, त्यांचे प्रश्न आणि वेदना जगाच्या डिजिटल चावडीवर मांडण्याचे सामर्थ्य या माध्यमात आहे. याचा अर्थ ऑनलाईन जर्नालिझम खरा समाज आणि खरी लोकशाही बळकट करणारे माध्यम आहे.
कोकण Mirror कडून आपण सर्वांनी अपेक्षा ठेवणे रास्त आहे, त्याचबरोबर आपण सर्वांनी वेळोवेळी तो अपडेट करून आपली मते, विचार आणि बातम्याही शेयर करून कोकण Mirror फास्ट करावा. आमच्या यंग नेटीजंसहो इन्फोटेक हे सेग्मेंट हे खासच तुमच्यासाठी बनवलं आहे. आपल्याला सतत आपल्या टॅब किंवा मोबाईल विषयी विविध समस्या जाणवत असतात. एखादा प्रोग्राम इनस्टॉल कसा करायचा इथ पासून ते मराठी टायपिंग कसं करायचं अशा तुमच्या अनेक प्रश्नांची उत्तरे तुम्हाला या सेग्मेंटमध्ये मिळतील.
मित्रहो! कुठल्याही प्रवासाला निघतांना, आपलं स्वतःचा डेस्टीनेशन आपल्याला माहित असतं. पण वाटेत आपल्याला माहित नसलेली अनेक छोटी मोठी स्टेशन्स लागतात. अगदी तसचं प्रत्येक क्षेत्रामध्ये घडत असतं. या छोट्या मोठ्या stop वरच अनेक मोहाचे, कसोटीचे आणि दबावाचे प्रसंग येतात. आपणा सर्वांना माहीत आहे. नेट पत्रकारिता म्हणजे ट्वेंटी -२० चा सामना असतो. पण पत्रकारितेचा मूळ प्राण आहे तो समाजाचे प्रबोधन. अर्थात दीर्घ कसोटीचा सामना. आणि हा कसोटी सामना कोकण Mirror कदापीही गमावणार नाही! आणि तो आपल्या सर्वांच्या जीवावर . . .
Advertisements


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.