Pages

Pages

Untouchable God .. --- अनिल सरमळकर

Untouchable God ..

पासून पुढे ...

            .. अनिल सरमळकर.

मागे वळून पहाव इतका काही माझ्या लेखनाला दिर्घ काळ झाला नाहीये.. पण इयत्ता सातवीत असतानाच
मी पहिली कविता लिहिली होती.. ती माझ्यापुरतीच होती.. तसे पाहिले तर मग दोन दशके झालीच आहेत लेखनाला...
खर तर कॉलेजमधे आल्यावर माझ लेखन जणु धरण फुटावे तस सुरु झाल.. आणि वाचन ? जशी की पुस्तके चावून चावुन खावून संपवत होतो.. या प्रकाराला कोणताही धरबंद नव्हता... पण मग मात्र काही ज्येष्ठ लोक मिळाले आणि मग लेखनाला दिशा मिळाली...
( अर्थात यात प्रत्येकाचा ओढा समज क्षमता आणि आवडीचा भाग वेगवेगळा असतो ... )

मी पुरोगामी चळवळीत ओढला गेलो होतो.. त्या अर्थीं तिकडे कल होता.. मला आठवतेय.. माझ्या मामाचे गाव चराठे.. सावंतवाडी.. माझा मोठा मामा विष्णू मामा
माझे खूपच लाड करायचा.. एक्दम अवलिया...
खुप प्रेमळ... माझा आवडता... त्याच्या त्या मळकट कब्जा वजा अंगरख्याच्या खिशात मला खावु मिळेच
पण कधी टेनिस बॉल.. अस काय काय मिळे...

सहजच एक दिवस मी असाच शोधत होतो त्या खिशात
( मी तेरा चौदा वर्शाचा असेन ) मला एक पुस्तक मिळाले..
नाव होते.. नवा करार....

Turning point... ?

पुस्तक दिसले की आपण स्वतःला थांबवु शकत नाही..
हे मला तेव्हापासुन लक्षात आले..
पण ते पुस्तक समजण्याइतके वय नव्हते माझे...

मग मला पुढे कळले की माझ्या मामाने मला

साक्षात  " ख्रिस्त ' भेट दिलाय..

तो मी आजही माझ्या आत प्रेमाने जपून ठेवलाय

ख्रिश्चन न होता "" .....

इथूनच रान उठले...

कॉलेज नंतर.. आठ आठ तास फक्त लेखन वाचन

साहित्य..  रंगभूमी..तत्त्वज्ञान.. धर्म  कला.. संगीत.. (  दोन्ही भारतीय व जागतिक )

जणू फडशा पाडला..

पण मूळ ओळख कवी अशीच आहे माझी..
तीच खरी ओरिजीनल आहे... कवीतेनेच सुरुवात झालीय
हजारो कविता प्रकाशनाच्या प्रतीक्षेत आहेत गेली एक..तप.. मराठी.. इंग्रजी.. दोन्ही..

या काळात कित्तेक वैचारीक लेख .. शेकडो एकांकिका.. शॉर्ट प्लेज.. आणि सुमारे वीस नाटके....

Small broken God ही 2010 मधे मी केलेली शॉर्ट फिल्म... या समांतर काळातच.. व्याघ्रकाळ.. मी अश्वत्थामा.. काळोखाचे काय करायचे.. राजकीय नाटक एक विचार.. मार्क्स मेला नाही.. इ मराठी पुस्तके तर

Passage of passive.. Broken earth Broken mind... An Orthodox... Marks redux..
post modern Era.. Rereading of the time..
 ही माझी इंग्रजी पुस्तके प्रकाशित झाली आहेत...

याव्यतिरिक्त ते चळवळीच्या नावावर सुसाट जगणे..
प्रचंड वाद विवाद.. शत्रू.. हितशत्रू तयार करणे
त्यातही स्वतःच्या गावापासून एक पुरोगामी वातावरण तयार करणे.. त्यासाठी द्यावी लागलेली किम्मत..

या सर्व ताणापासुन मुक्त होण्यासाठी केलेली भजने..
गाणे.. क्रिकेट... आणि केलेल्या कित्तेक हळुवार निसर्ग..प्रेम कविता.. भाव कविता ....

आणि अर्थातच.. Above All Big project
म्हणजे ... पूर्ण प्रोफेशनल चित्रपट

KAHOOR ...

अगदी तीन वर्षे अत्यंत Struggle करुन
बनलेला माझा पहिला मराठी चित्रपट ...

अनेक अडचणी.. आणि विलंब झालेला..
( Lockdown चे हे आता नवे संकट )

आणि... एक जीवघेणी वेदना प्रत्येक लेखक आपल्या खोल जगत असतो .. शब्दात ती मरु शकते.. पण लेखकला ती जतन करायची असते..
जाणीवा आणि जखमा जितक्या अपार तितका लेखक उंच उंच होत जातो.... मग आभाळाला त्याचा स्पर्ष झाला की आभाळच वेदना होवुन बरसते... मग लेखक स्वता आणि वाचकालाही पुन्हा वेदनेच्या महामार्गावर आणुन सोडतो... हे नित्य आहे... आणि असेल तरच साहित्य थोर...

या थोर पदाला माझ्या पिढीला जायचे नाहीये...
आम्ही लेखक.. महामार्गावर आणुन सोडनारे नाहीत..
दिसल्याच तर चुकुन लहनश्या वाटा आमच्याकडुन...

फ्क्त पंधरा सोळा वर्षेच्या काळात हे सर्व माझ्याकडुन झालय... ती गती आता तेवढी फास्ट नाहीये... पण त्यात आता थोडी प्रगल्भता आलीये हे नक्कि..

पुढे हा प्रवास Untouchable God च्याच दिशेने जाणारा आहे...
 काय आहे हे Untouchable God ' ?

माझी मीच निर्माण केलेली प्रेरणा...
एक दिर्घ महाकथन
महाकादंबरी...
a mega poetic Novel ...

ज्याची मी गेल्या पंधरा वर्षात फ्क्त 100 पाने लिहिलीत
हजारो पानांची ही महाकादंबरी माझ्यासारख्या
समाजाच्या नाकारलेल्या भवतालातुन आलेल्या
प्रत्येकाची.. The Roots आहे किवा

ULysiss ....

दुसर्याना झुडुपे समजुन आपण कुणी जरा जास्तच फांद्या असलेले वृक्ष आहोत असे समजुन काम करणार्या लोकांची कमी नाहीये कोकणात... कोणतेही साहित्यातील
वारसा असलेले कुटुंब माझ्या मागे नसताना .. कोणतीही
सो कॉल्ड ब्रॅन्ड जात माझ्या मागे नसताना... जाती बांधव वगेरे नसताना... तरिही सर्वांनी मिळून केलेली बदनामी मानहानी असताना मी जिथे झुडुपे दिसली तिथे त्यांच्या आजूबाजूला अस्सल धार्दार कोकणी कोयत्याने बेतले..
झुडुपे वाढुन मोठी झाडे होतील का पाहिले .. तेही माझ्या कुवतीनुसार ......

नाटकाचे.. रंगभूमीचे एवढे वेड की मी वेगवेगळ्या जाती धर्मातील तरूण मुलाना घेवुन जिल्ह्यात  दुर्गम खेडोपाडी
जीथे स्टेज नसेल तिथे लोकांच्या खळ्यातही दोन खुंट्याना मागे  " single curtain ' ( साधे कापड हो )
बांधुन नाटके केली.... अगदी सावंतवाडी तालुक्यातील शहरातील व खेड्यातील वेगवेगळ्या जातीतील सुशिक्षित उच्च विचारांची चांगल्या कुटूंबातील ही मुले मुली
केवळ वेडापायी माझ्याबरोबर सगळ्या गैरसोयी सहन करत ... त्यामागे त्यांचा आणि माझा कोणत्याही प्रकारचा
Attitude नव्हता...

atitude म्हंजे आपण काहीतरी ग्रेट सामाजीक समतेचे काम वगेरे करतो वगेरे...
काहीही नाही... आम्ही सर्वजण crazy होतो
तरुण होतो... सो ते झपाट्याने करत होतो..

आज ही सर्व मुले मुली देशात even परदेशातही सेटल आहेत.. कधी तरी call करतात... विचारपूस करतात..
आणि मग माझी बेसुमार स्तुती करु लागतात..
मग मी Subject change करतो...

मग हे वेड थेट मला अमेरिकन ब्रॉडवेवर..
जागतिक रंगभूमीवर घेवुन गेले..
The fox या माझ्या नाटकाद्वारे ...

हे माझे एकट्याचे यश नाही..
माझ्या त्या सर्व साथीदारांचे आहे..

आणि तरिहि ... आजही.

Attitude... Zero ...

रंगभूमीचे चेटूक काय असते हे अनुभवायचे असते..
साक्षात रतन थियाम रंगभूमीवर काय किमया करतात त्याच साक्षीदार असाव लागत... पहिल्या रांगेत बसुन
नसिरुद्दीन शहा यांच The father पाहताना कळत
आपल्या समोर अभिनयाचा हिमालय उभा आहे..
तेव्हा आपण फ्क्त आणि फ्क्त... Stun... निशब्द
आणि सर्व काही हरवुन बसलेले असतो..
आपल्या आयुष्याचा हरेक अगम्य आणि महादुखाचा
उद्रेक चेहऱ्यावरच्या एक एक सुरकुत्यामधुन हसवत रडवत रुपेरि पडद्यालाही आकंठ.. आवंढा गिळायला
लावणारा  फिलिफ टॉड ... त्याच्याबरोबर रडता आल पाहिजे.... आपल्याच व्यवस्थेने एखाद्या स्त्रिला डाकु
बनवण्याआधी.. पूर्ण मानवी युगाला लाज वाटेल अस कृत्य करुन तिला उध्वस्त केल्यावर आमचच समाजाच कृत्य पडद्यावर दाखवताना समाज म्हणून आपणच कसे सारे नग्न आहोत हे दाखवणारा  अत्यन महत्वाचा दिग्दर्शक शेखर कपुर संमजुन घ्यावा लागतो.... जिजस लाही माणूस म्हणुन त्याच देवत्व हळुवार हाताळणारा
दिग्दर्शक मेल गिब्सन... नीट समजुन जोखायचा असतो...
गायनही प्रायोगिक असते त्यासाठीच अभिषेकी बुआना
कानात प्राण साठवून ऐकावे लागेल...

( यासाठी माणुस पुरोगामी.. किवा खोटा खरा पुरोगामी किवा कोणीही चालतो... त्यापेक्षा साधारण सरळ माणुसच  बरा.. )

कला कितीही सुंदर असली तरि ती रौद्रही आहे..
तिचा आणि आपला form.. स्वर आणि धागा
जुळायला हवा.. नाहीतर संपलेच सगळे...

अर्थात तो स्वर जुळण्यासाठी
साधना हवी..

Shot Cut नाही...

No short cut .....

कोकणात कलाकार खुप आहेत...  कोकणात कलाकारांची खाण आहे  असे वाक्य मी नेहमी ऐकतो ...

पण खाण असुन चालणार नाही...

वाण.. खमके असायला हवे...

आम्ही हे लक्षात ठेवावे की...

अमिताभ..  दिलीप कुमार.. नसिरुद्दीन शहा.. रेहमान..
शेखर कपूर.. गिब्सन...
आणि.... फिलिप टॉड ...कोकणातले नाहीयेत..

समारोपाला आता
Untouchable God कडे येतो
ते माझे मीच ठरवलेले कथन आहे
प्रत्येकाचे असावे एखादे...

आपले प्रत्येकाचे महाकथन असायला हवे..
पुर्ण होइल तेव्हा होवो..

मला माहिती नाही की माझ्या म्हातारपणी तरी
माझ्या महाकादंबरीचे लेखन संपेल की नाही...

निदान तोवर माझे हे झुडुप एखादा लहान का असेना वृक्ष होइल...

आणि हो .. मी मला नेहमीच सांगत राहीन ना की
मला माझ महाकथन लिहायचे आहे....

©...... Anil Saramalkar
   

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.